vidyanand bapat
sakal
पुणे - ‘ध्वनी प्रदूषणाविरोधातील बापट यांची ही भावना सर्वसामान्य पुणेकरांचीच भावना आहे. धर्म, परंपरा तसेच सण उत्सवांवर गुंडशाही ताबा मिळवत असून जनतेवर दहशत निर्माण करत आहे. बापट यांना मारहाण हा सामान्य नागरिकांचा गळा घोटण्याचाच प्रकार आहे.’ अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी, संघटना यांच्याकडून विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या मारहाणीच्या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.