Shirur News : पूजा गई यांचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यु झाल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी; पती राहुल देवीदास गई यांची मागणी

शस्त्रक्रियेदरम्यान, पत्नीची प्रकृती गंभीर झाली तर मला सांगितले का नाही, मला भेटू का दिले नाही, तीच्यावरील नेमक्या उपचारांची माहिती का दिली नाही.
Devidas Gai Agitation

Devidas Gai Agitation

sakal

Updated on

शिरूर - पूजा राहुल गई (वय-२८, रा. रांजणगाव गणपती, ता. शिरूर) यांचा हाताच्या कोपरावर शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यु झाल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांचे पती राहुल देवीदास गई यांनी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी आजपासून येथील तहसिलदार कार्यालयासमोर उपोषण आंदोलन सुरू केले. गई यांच्या अनेक नातेवाईकांसह ते काम करीत असलेल्या रांजणगाव एमआयडीसीतील जाबील कंपनीतील त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी दिवसभर आंदोलनस्थळी उपस्थित राहून त्यांना पाठिंबा दर्शविला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com