
पुणे - शहराच्या वेगवेगळ्या भागातील ओढे-नाले, कालव्यांवर महापालिकेने पुल बांधले, मात्र संबंधित पुलांची स्थिती नेमकी काय आहे, याची आत्तापर्यंत पाहणी झालेली नाही. त्यामुळे संबंधित पुलांची सद्यःस्थिती काय आहे, त्यामध्ये काय सुधारणा कराव्या लागतील, यासंदर्भात संबंधित पुलांचे महापालिकेकडुन "स्ट्रक्चरल ऑडीट' केले जाणार आहे.