खडकवासला - पानशेत व वरसगाव धरणांच्या संपादित क्षेत्रात असलेल्या अतिक्रमणांचा सर्वेक्षण करा. तसेच धरणातील गाळाच्या प्रमाणाचे सर्वेक्षण करून गाळ काढण्याच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्याची सुचना जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे- पाटील यांनी दिल्या आहेत.