confusion again over Mahajyoti result More than aggregate marks in MPSC Exam
confusion again over Mahajyoti result More than aggregate marks in MPSC ExamSakal

MAHAJYOTI : महाज्योतीच्या निकालाबद्दल पुन्हा संभ्रम; MPSCच्या चाळणी परीक्षेत एकूण गुणांपेक्षा अधिक गुण

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (महाज्योती) वतीने घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षेच्या निकालाबद्दल संभ्रम निर्माण झाला
Published on

पुणे : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (महाज्योती) वतीने घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षेच्या निकालाबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. काही विद्यार्थ्यांना १०० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून, मागील परीक्षा वादग्रस्त ठरल्याने उमेदवार हवालदील झाले. अशातच सुधारित निकाल लवकरच घोषित करण्यात येईल, अशी माहिती महाज्योतीने दिली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाज्योतीच्या वतीने चाळणी परीक्षा घेण्यात येते. यापूर्वी घेतलेल्या चाळणी परीक्षेत गोंधळ झाला होता. तर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या चाळणी परीक्षेत एका केंद्रावर सामुहीक ‘कॉपी’ करण्यात आली होती.

त्यामुळे ती परीक्षा रद्द करण्याची नामुष्की महाज्योतीवर ओढावली होती. त्यात भर म्हणजे एमपीएससीच्या मागील चाचणी परीक्षेत एका खासगी खासगी शिकवणीच्या सराव परीक्षेतील प्रश्नांचा समावेश करण्यात आला होता.

तपासात हे उघड झाल्यानंतर ती सुद्धा परीक्षा रद्द करावी लागली होती. आता परीक्षा सुरळीत पद्धतीने पार पडली खरी पण निकालात विद्यार्थ्यांना २०० पैकी २०० किंवा त्याहून जास्त गुण असल्याने पुन्हा गोंधळाची स्थिती आहे. परीक्षे संबंधीचे आजवरचे ‘रेकॉर्ड’ पाहता उमेदवार हवालदील झाले आहे. इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी महाज्योतीच्या वतीने कार्य करण्यात येते.

शंका बाळगू नका - महाज्योती

निकालाबद्दल निर्माण झालेला गोंधळ पाहाता महाज्योतीच्या वतीने एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यात ते म्हणतात, ‘‘नॉर्मलायझेशन केल्यामुळे काही विद्यार्थ्यांचे गुण हे परीक्षेच्या एकूण गुणांपेक्षा अधिक दिसत आहेत.

केलेली प्रक्रिया ही बरोबरच आहे, असे परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेने स्पष्ट केले आहेत. तथापि याबाबत कोणतीही शंका राहू नये म्हणून, संकेतस्थळावरील गुणपत्रिका हटविण्यात आलेली आहे. तज्ज्ञांकडून नॉर्मलायझेशन फॉर्मुला बरोबर असल्याची खात्री करून घेऊन पुन:श्च निकाल प्रसिद्ध करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी याबाबत कोणतीही शंका मनात बाळगू नये.’’

महाज्योतीच्या चाळणी परीक्षांमध्ये नेहमी गोंधळ दिसत आहे. वादग्रस्त ठरलेल्या परीक्षांचे कंत्राट काढून नव्या कंपन्यांना देण्यात आले. मात्र, स्थिती जैसी थे आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा महाज्योतीचा भोंगळ कारभार उघड झाला आहे

- महेश घरबुडे, कार्याध्यक्ष, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com