
पुणे - केंद्र सरकारने इयत्ता पाचवी आणि आठवीच्या मुलांच्या वार्षिक परीक्षा घेऊन उत्तीर्ण मुलांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात येईल, असा निर्णय जाहीर केला. तर राज्य सरकारने हे धोरण यापूर्वीच स्वीकारले आहे. या धोरणामुळे शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश घेतलेला विद्यार्थी वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास त्याला मोफत शिक्षणाची सवलत मिळणार का?