सांगा, 'एवढे' बिल कसे भरावयाचे ? पुण्यात वीजबिलांचा गोंधळ काही केल्या मिटेना!

उमेश शेळके 
Thursday, 3 September 2020

दौंडकर सेवानिवृत्त शिक्षक आहेत. त्यांना दर महिना हजार ते बाराशे वीजबिल येते. यंदा जुलै महिन्यांचे बिल सुमारे 18 हजार रुपये आले आहे. हीच परिस्थिती काळे यांची देखील आहेत. त्यांची देखील आर्थिक परिस्थिती बेताची आहे. यावरून महावितरणच्या वीजबिलातील गोंधळ अद्याप मिटलेला नाही.

पुणे : गोखलेनगरमधील पूरग्रस्त वसाहतीतील एका चाळीतील बैठे घर...वीजबिल आले आहे 18 हजार रुपये. घरात पत्नी आजारी. त्यामध्ये एवढे बिल कसे भरावयाचे असा प्रश्‍न उभा आहे सेवानिवृत्त जयवंत दौंडकर यांच्या पुढे. तर त्याच परिस्थितीमध्ये राहणाऱ्या अमृता काळे. त्या कंत्राटीपद्धतीने रयत शिक्षण संस्थेस शिक्षिका आहेत......त्यांना दरमहा सहाशे ते आठशेच्या दरम्यान वीजबिल येत होते. मात्र त्यांना जुलै महिन्याचे वीजबिल आले आहे ते 44 हजार 989 रुपये. दौंडकर यांच्या प्रमाणे त्यांच्यापुढेही हाच प्रश्‍न आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दौंडकर सेवानिवृत्त शिक्षक आहेत. त्यांना दर महिना हजार ते बाराशे वीजबिल येते. यंदा जुलै महिन्यांचे बिल सुमारे 18 हजार रुपये आले आहे. हीच परिस्थिती काळे यांची देखील आहेत. त्यांची देखील आर्थिक परिस्थिती बेताची आहे. यावरून महावितरणच्या वीजबिलातील गोंधळ अद्याप मिटलेला नाही. गोखलेनगर, जनवाडी, निलज्योती सोसायटी, पीएमसी कॉलनी, रामोशीवाडी परिसरातील सुमारे चारशे ते साडेचारशे कुटुंबीयांना अशा प्रकारे किमान दहा हजार ते साठ हजारपर्यंतची वीजबिले आली आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने 23 मार्च रोजी राज्यात लॉकडाऊन लागू केला. त्यानंतर तीन वेळा लॉकडाऊन वाढविण्यात आला. या कालावधित महावितरणकडून वीजबिलासाठी मीटर रीडिंग घेणे बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे महावितरणकडून सरासरी वीजबिले ग्राहकांना पाठविण्यात आली होती. त्यामध्ये अनेक चुका झाल्याने नागरिकांना मोठ्या रकमेची बिले आली होती. त्यावरून मध्यंतरी बराच गोंधळ देखील झाला होता. वीजबिल भरणा केंद्राबाहेर नागरिकांच्या मोठ्या रांगा लागल्याचे देखील पाहवास मिळाले होते. असे असतानाही वीजबिले अचूक असल्याचा दावा महावितरणकडून करण्यात आला होता. परंतु गोखलेनगर आणि परिसरातील नागरिकांच्या तक्रारीवरून दीड ते दोन महिन्यानंतरही हा गोंधळ अद्यापही मिटलेला नसल्याचे समोर आले आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महावितरणकडून जवळपास गोखलेनगर आणि परिसरातील 437 ग्राहकांना वाढीव बिले पाठविण्यात आली आहेत. ती पूर्णतः: चुकीची असून तातडीने ती दुरुस्त करून द्यावीत. तो पर्यंत कोणत्याही ग्राहकांवर कारवाई करू नये. तसेच ती बिले भरण्यासाठी हप्ता करून द्यावा. अन्यथा नागरिकांना बरोबर घेऊन आंदोलन करण्यात येईल. 
- योगेश बाचल ( उपाध्यक्ष, भाजप) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The confusion of electricity bills in pune is still going on