esakal | पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा गोंधळ संपेना

बोलून बातमी शोधा

Scholarship-Exam

सरकारने यामध्ये लक्ष देऊन चुका करणाऱ्या दोषींवर कारवाई केली पाहिजे. दरवर्षी छपाईच्या चुका सांगून पांघरूण घातले जात आहे. परीक्षा निर्दोष कधी होईल? कारण गेल्या चार वर्षांपासून ३०० गुणांची परीक्षा झालीच नाही.
-  अमोल नवलपुरे, पालक

पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा गोंधळ संपेना
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी - नुकत्याच झालेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा गोंधळ नेहमीप्रमाणे काही मिटता मिटेना. सुरुवातीला प्रश्‍नपत्रिकेत चुका होत्या. आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने प्रसिद्ध केलेल्या उत्तरसूचीमध्ये चुका आढळल्या. आठवी सेमी इंग्लिश माध्यमाच्या ‘सी’ आणि ‘डी’ सेट कोडची संपूर्ण उत्तरसूचीच चुकली होती. परिणामी, परिषदेला पुन्हा सुधारित उत्तरसूची जाहीर करण्याची नामुष्की ओढवली आहे. त्यातही अनेक आक्षेप नोंदविण्यात येत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे राज्यभरात १६ फेब्रुवारीला पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा झाली. त्यात पाचवीसाठी ७ हजार ९४६, तर आठवीसाठी ४ हजार ७७८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ७७ केंद्रांवर मराठी, उर्दू, हिंदी, इंग्रजी, सेमी इंग्लिश या माध्यमांमध्ये ही परीक्षा झाली. पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या प्रश्‍नपत्रिकेत प्रश्‍न चुकले होते. गणितात एकूण प्रश्‍न ५० होते. त्यातील ४२ चुका या उत्तरसूचीमध्ये आढळल्या आहेत. परिषदेने बुधवारी (ता. ४) उत्तरसूची जाहीर केली होती; पण आठवीच्या उत्तरसूचीमध्ये दोन प्रश्‍न रद्द केले असून, एका प्रश्‍नाचे तीन प्रकारे उत्तराचे पर्याय सुचवले आहेत. तांत्रिक कारणांनी चुका झाल्याचे सांगून या विषयावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न परीक्षा परिषदेने केला. परिषदेच्या संकेतस्थळावर सुधारित उत्तरसूची शुक्रवारी (ता. ६) दुपारनंतर प्रसिद्ध केली. त्यावरदेखील पाचवीच्या गणित पेपरमध्ये ५२५ ऐवजी ५५२ रुपये असे छापले आहे. 

आठवीच्या गणितामधील स्तभांलेख चुकला आहे. बुद्धिमत्तामधील सांकेतिक भाषेवरील दोन्ही प्रश्‍न चुकलेले आहेत, असे आक्षेप पालक अमोल नवलपुरे यांनी नोंदविले आहेत. दरम्यान, आता दुरुस्तीचे काम सुरू असून, छपाई करणाऱ्यांची ही चूक आहे, असे उत्तर परीक्षा परिषदेकडून मिळत आहे.