हडपसरमध्ये काँग्रेसचे 'अग्निपथ' विरोधात आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Congress agitation against Agneepath scheme army recruitment employment in Hadapsar

हडपसरमध्ये काँग्रेसचे 'अग्निपथ' विरोधात आंदोलन

हडपसर : मोदी सरकारने सैन्य भरतीसाठी आणलेली ‘अग्निपथ’ ही योजना कंत्राटी पद्धत लागू करणारी व सैन्यात भरती होऊ पाहणाऱ्या तरूणांचे भवितव्य उध्वस्त करणारी आहे. केवळ चार वर्षांच्या सेवेनंतर तरुणांना परत बेरोजगारीत ढकलण्याचा हा डाव आहे. लष्करी सेवेत भरती होऊन देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांच्या भवितव्याशी सरकार खेळत आहे, असा आरोप काँग्रेसचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी केला.

केंद्र सरकारने सुरू केलेली "अग्निपथ योजना' व ईडीने गांधी परिवारावर केलेल्या कारवाईच्या विरोधात हडपसर येथील गांधी चौकामध्ये स्थानिक कॉंग्रेसच्या वतीने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले. त्यावेळी माजी राज्यमंत्री शिवरकर बोलत होते. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून अग्निपथ योजनेचा निषेध केला.

प्रशांत तुपे, अभिजित शिवरकर, राहुल शिरसाट, विजय जाधव, उर्मिला आरु, दिलीप तुपे, नितीन आरु, बाळासाहेब गोंधळे, गणेश फुलारे, स्वप्नील डांगमाळी, अल्ताफ शेख, बाळासाहेब हिंगणे, इंदिरा तुपे, पुष्पा गायकवाड, खंडू लोंढे, दीपक गुप्ता, राजू शिंदे, दत्ता डुरे, वैभव डांगमाळी, निलेश ससाणे, अजित ससाणे, जान महंमद शेख, महेंद्र तिडके, जयपाल भागवत, सोमनाथ देडगे, संजय लोखंडे, अकुशं शिंदे, दिपक गुप्ता, महेश ननावरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. दरम्यान आमदार संग्राम थोपटे व शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी या आंदोलनाला भेट देऊन कार्यकर्त्यांशी सवांद साधला.

Web Title: Congress Agitation Against Agneepath Scheme Army Recruitment Employment In Hadapsar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top