कॉंग्रेसचे माजी उपमहापौर प्रसन्न जगताप भाजपमध्ये

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

पुणे - कॉंग्रेसचे माजी उपमहापौर प्रसन्न जगताप यांच्यासह 22 जण, डेक्कन जिमखाना परिसरातील डॉ. अजय दुधाणे, लुल्लानगरमधील जमिला शेख यांच्यासह आठ जणांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत गुरुवारी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.

पुणे - कॉंग्रेसचे माजी उपमहापौर प्रसन्न जगताप यांच्यासह 22 जण, डेक्कन जिमखाना परिसरातील डॉ. अजय दुधाणे, लुल्लानगरमधील जमिला शेख यांच्यासह आठ जणांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत गुरुवारी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.

जगताप हे सिंहगड रस्त्यावरील प्रभाग क्रमांक 34 हिंगणे खुर्द-सनसिटी प्रभागातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. दुधाणे हे प्रभाग 14 डेक्कन जिमखाना-मॉडेल कॉलनीमधून, तर जमिला शेख या वानवडी परिसरातून महापालिका निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी त्यांचे स्वागत केले.
दरम्यान, जिल्ह्यामध्ये येत्या 14 डिसेंबर रोजी 10 नगरपालिकांच्या निवडणुका होत असून त्याअगोदरच भाजपचे 7 नगरसेवक बिनविरोध निवडून आले असल्याचे पालकमंत्री बापट यांनी या वेळी सांगितले. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे म्हणाले, ""तळेगाव दाभाडेमधून 3 आळंदी आणि शिरूर नगरपालिकेमधून प्रत्येकी 2 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. नगरपालिका निवडणुकीअगोदरच भाजपला हे मोठे यश मिळाले आहे. पुणे जिल्ह्यात यापूर्वी नगरपालिकांमध्ये भाजपचे केवळ 9 नगरसेवक होते. आगामी निवडणूक 229 जागांसाठी होत असून भाजपने 151 जागांवर उमेदवार उभे केले आहेत, तर 24 ठिकाणी भाजपपुरस्कृत उमेदवार आहेत. आगामी निवडणुकांमध्ये जिल्हयामधून राष्ट्रवादी कॉंग्रेस मुक्त करण्याचा आमचा प्रयत्न असेल. भाजपचा प्रत्येक आमदार आणि नगरसेवक पक्षाच्या प्रचारासाठी कामाला लागला आहे. शिरूर, सासवड, जेजुरी, बारामती, तळेगाव आणि लोणावळा या नगरपालिकांमध्ये पक्षाला चांगले यश मिळण्याची अपेक्षा आहे.

प्रचारासाठी भाजपची फौज
राज्यामध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपला चांगले यश मिळाले. त्यामुळे आता पुणे जिल्ह्यातील निवडणुकांवर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. येत्या 14 डिसेंबरला 10 नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्यासह पंकजा मुंडे, गिरीश बापट, सदाभाऊ खोत, दिलीप कांबळे हे मंत्री प्रचारासाठी रिंगणात उतरणार आहेत, असे जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे यांनी सांगितले.

Web Title: Congress and former Deputy Mayor prasanna Jagatap in bjp