राज्याच्या राजकारणाची दिशा ठरणार; बाळासाहेब थोरातांची शरद पवारांशी चर्चा (व्हिडिओ)

टीम ई-सकाळ
Saturday, 26 October 2019

एका बाजुला मुंबईत मातोश्रीवर शिवसेनेची बैठक सुरू असताना काँग्रेस राष्ट्रवादीच्या बारामतीतील  बैठकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. बाळासाहेब थोरात यांनी बारामती येथील गोविंद बाग येथे शरद पवार यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली.

बारामती : विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असतानाही काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना या नव्या समीकरणाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामतीत भेट घेतली. या वेळी खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार उपस्थित होते. पण, अजित पवार यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. 

एका बाजुला मुंबईत मातोश्रीवर शिवसेनेची बैठक सुरू असताना काँग्रेस राष्ट्रवादीच्या बारामतीतील  बैठकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. बाळासाहेब थोरात यांनी बारामती येथील गोविंद बाग येथे शरद पवार यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी थोरात यांचे स्वागत  केले. त्यानंतर सुप्रिया सुळे बैठकीतून बाहेर गेल्या आणि शरद पवार, बाळासाहेब थोरात आणि रोहित पवार यांच्यात जवळपास तासभर चर्चा झाली.

भाजपला पाठिंबा दिल्याने माजी सैनिकाने सोडला पक्ष

पवार यांची भूमिका
विधानसभा निवडमुकांचा निकाल लागल्यानंतरच शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी शिवसेनेसोबत जाण्याचा आमचा विचार नाही, असे पत्रकारांना स्पष्ट केले होते. भाजपला एकहाती सत्ता मिळणार नसल्यामुळे त्यांना शिवसेनेची मदत घ्यावीच लागणार आहे. तर, काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र आल्यास भाजपला सत्तेपासून रोखता येणार आहे. त्यामुळेच या राजकीय समीकरणाची चर्चा सध्या सुरू आहे.

पहिल्यांदा शपथ घेतलेले सहा मंत्री घरी; आता सगळेच झाले सावध

थोरात काय म्हणाले होते?
या संदर्भात काल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्या त्यांनी 'भाजपच्या छायेत किती दिवस रहायचे, याचा शिवसेनेने विचार करावा.' असा टोला लगावला होता. त्याचवेळी शिवसेनेसोबत जाण्याविषयीही त्यांनी भाष्य केले होते. समोरून प्रस्ताव आला तर, त्याचा विचार करू, असे थोरात यांनी म्हटले होते. त्यामुळे पवार-थोरात या भेटीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress leader balasaheb thorat meets ncp supremo sharad pawar at baramati