esakal | राष्ट्रवादी काँग्रेसने गैरफायदा घेतला : हर्षवर्धन पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रवादी काँग्रेसने गैरफायदा घेतला : हर्षवर्धन पाटील

आम्ही साडेचार-पाच वर्षे सत्तेत नव्हतो. पण छोटं-मोठं काम केले. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला कधीही नकार दिला नाही, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने गैरफायदा घेतला, असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसने गैरफायदा घेतला : हर्षवर्धन पाटील

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

इंदापूर : आम्ही साडेचार-पाच वर्षे सत्तेत नव्हतो. पण छोटं-मोठं काम केले. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला कधीही नकार दिला नाही, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने गैरफायदा घेतला, असेही ते म्हणाले.

इंदापूर येथील जाहीर कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील बोलत होते. ते म्हणाले, 2014 जेव्हा आमचा पराभव झाला. तेव्हा सभेला जो कार्यकर्ता आला होता. त्यातील एकही कार्यकर्ता पक्ष सोडून गेला नाही. फसवेगिरी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. तसेच इंदापूरची जागा सोडायला राष्ट्रवादी काँग्रेसने नकार दिला. त्यांनी गैरफायदा घेतला, असेही ते म्हणाले. 

दरम्यान, हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या. त्यानंतर आता हर्षवर्धन पाटील यांनी हे वक्तव्य केले.

loading image
go to top