esakal | दोन पाटलांची बंद खोलीत चर्चा; भाजप प्रवेश होणार?
sakal

बोलून बातमी शोधा

BJP.jpg

पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादीला आणखी एक मोठा राजकीय हादरा बसणार आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पूर्वीपासून निकटवर्तीय असलेले माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील भाजपाच्या वाटेवर आहेत.

दोन पाटलांची बंद खोलीत चर्चा; भाजप प्रवेश होणार?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

इंदापूर : पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादीला आणखी एक मोठा राजकीय हादरा बसणार आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पूर्वीपासून निकटवर्तीय असलेले माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील भाजपाच्या वाटेवर आहेत.

त्यांनी आज बुधवार अकलूज येथे जाऊन विजयदादा यांची भेट घेतली. उभय नेत्यांमध्ये बंद खोलीत तासभर चर्चा झाली. त्यांच्यासमवेत त्यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील, अकलूजचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील हेही उपस्थित होते.

त्यानंतर आजच निर्णय घेतो असे सांगून हर्षवर्धन पाटील बावड्याकडे रवाना झाले. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यामुळे राष्ट्रवादीला मोठे राजकीय धक्के मिळत आहेत. त्यानंतर आता पुणे जिल्ह्यातील वजनदार राजकीय नेते हर्षवर्धन पाटील यांनाही भाजपमध्ये आणण्यासाठी विजयसिंह मोहिते पाटलांची राजकीय खेळी यशस्वी ठरत आहे. हर्षवर्धन पाटलांनी भाजपमध्ये जाण्यासाठी आज आपल्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत काय निर्णय हाेताे ते पाहणे  आेत्सुक्याचे ठरणार आहे. 

loading image
go to top