Pune Politics News : पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढवणार का? रवींद्र धगेंकरांनी दिलं उत्तर

Congress mla ravindra dhangekar on contesting Pune Lok Sabha bypoll election pune lok sabha byelection News
Congress mla ravindra dhangekar on contesting Pune Lok Sabha bypoll election pune lok sabha byelection News

पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी पोटनिवडणूक होणार असून येथे निवडणूकीच्या मैदानात कोण उतरणार यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.

या राजकीय चर्चांमध्ये कसाब्याचे आमदार रविंद्र धंगेकर यांचं नाव पुढे येत आहे. यादरम्यान लोकसभा पोटनिवडणूक लढवण्याबाबत आमदार धंगेकरांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

साम टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, आमदार रवींद्र धगेंकर हे सध्या पंढरपूरच्या दौऱ्यादरम्यान माध्यमांशी संवाद साधला. धंगेकर म्हणाले की, भाजपने निवडणूकीपूर्वी सर्वसामान्य लोकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्ती केली नाही. त्यामुळे भाजप आणि मोदी सरकार विरोधात देशात आणि राज्यात मोठी लाट तयार झाली आहे. त्यामुळे जनता मोदी सरकारला त्यांच्या मूळ ठिकाणावर नेऊन ठेवेल असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Congress mla ravindra dhangekar on contesting Pune Lok Sabha bypoll election pune lok sabha byelection News
Dalai Lama News : दलाई लामा यांचा 'तो' वादग्रस्त व्हिडिओ अन् तिबेटमधील 'ती' विचित्र परंपरा

गेल्या दहा वर्षांमध्ये मोदी सरकारने सर्वसामान्य जनता,शेतकरी आणि व्यापारी यांचे एक ही काम केले नाही. उलट महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या विरोधात देशात मोठी लाट तयार झाली आहे, असे धंगेकर म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी ते पुणे लोकसभेची पोट निवडणूक आपण लढवणार नाही, हे स्पष्ट केले.

Congress mla ravindra dhangekar on contesting Pune Lok Sabha bypoll election pune lok sabha byelection News
Maharashtra : प्रस्थापीतांना धक्का देण्यासाठी राज्यात नव्या पक्षाची एंट्री! छत्रपती संभाजीनगरमध्ये घेणार सभा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com