

दिल्लीतील आंदोलनासाठी सोलापुरातून ५०० काँग्रेस कार्यकर्ते जाणार
दिनेश कोडनिया याची माहिती; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासह एसआयआर रद्द करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २८ : मतदानाचा अधिकार व लोकशाहीच्या संरक्षणासाठी काँग्रेसतर्फे दिल्लीत आयोजित ‘व्होट बचाव, देश बचाव’ आंदोलनात सोलापूर जिल्ह्यातून सुमारे ५०० कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्यासह एसआयआर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी आंदोलनातून करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय काँग्रेसचे निरीक्षक दिनेश कोडनिया यांनी दिली.
---------------------
लोकशाही धोक्यात असल्याचा आरोप
मतदारांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप कोडनिया यांनी केला. याविरोधात काँग्रेसतर्फे २५ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत ‘व्होट बचाव, देश बचाव’ अभियान राबविण्यात येत आहे. याच अभियानांतर्गत दिल्लीत आंदोलन होणार आहे. न्यायपालिका व निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या बाजूने काम करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
---------------------
भाजपने चर्चेला सामोरे जावे : नरोटे
काँग्रेसने देशभरात सुरू केलेल्या आंदोलनाचा भाजपने धसका घेतला आहे. काँग्रेसने उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर भाजपच्या नेत्यांनी आमनेसामने येऊन चर्चा करावी, असे आव्हान शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी दिले. खासदार प्रणिती शिंदे यांना भाजपकडून विनाकारण लक्ष्य केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.