Vidhan Sabha 2019 : सोशल मीडियावर काँग्रेस शांतच 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 October 2019

Vidhan Sabha 2019 : पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. मात्र, सुस्तावलेली काँग्रेस अद्याप पूर्णपणे मैदानात उतरलेली दिसत नाही. भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेना या पक्षांच्या तुलनेत 'सोशल मीडिया'वर काँग्रेस कुठेच दिसत नसल्याचे चित्र आहे. ट्‌विटरवर तर काँग्रेस नेत्यांची अकाऊंट अपडेट झालेली नाहीत. 

Vidhan Sabha 2019 : पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. मात्र, सुस्तावलेली काँग्रेस अद्याप पूर्णपणे मैदानात उतरलेली दिसत नाही. भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेना या पक्षांच्या तुलनेत 'सोशल मीडिया'वर काँग्रेस कुठेच दिसत नसल्याचे चित्र आहे. ट्‌विटरवर तर काँग्रेस नेत्यांची अकाऊंट अपडेट सुध्दा झालेले नाहीत. 

सध्या सोशल मीडियाचा वापर प्रत्येक गोष्टीमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. त्या राजकारण्यांकडून याचा सर्वांत प्रभावीपणे वापर केला जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्याच्या विधानसभा निवडणुकीत फेसबुक, ट्‌विटर, इंस्टाग्राम आदी माध्यमातून नेते जनतेशी संवाद साधत प्रचार करत आहेत. मात्र, यामध्ये काँग्रेस फारच मागे असून ट्‌विटरवर तर कुठेच नसल्याचे चित्र आहे. राज्यातील आणि देशातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची ट्विटर खाती प्रचार काळातही शांत आहेत. यातील बहुतांश नेत्यांनी मागील बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही प्रकारचे ट्‌विट केलेले नाही.
 
राज्याच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून किंबहुना प्रचारास सुरवात झाल्यापासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, ज्योतिरादित्य सिंदिया, सचिन पायलट, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, राजीव सातव, सत्यजित तांबे आदी नेत्यांची ट्विटर खाती पाहिली तर ते निवडणूक प्रचारात नसल्याचेच दिसून येते. परिणामी, काँग्रेस जरी विधानसभेच्या निवडणुकीत उतरलेली असली तरी, त्यांच्यात लढण्याची इच्छाशक्ती आणि ताकद नसल्याचे दिसून येते. याच वेळी सोशल मीडियाचा प्रचारासाठी भाजप प्रभावीपणे वापर करत असल्याचे दिसून येते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress is quiet on social media in Maharashtra vidhan sabha 2019