सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणूक काँग्रेसने लढवावी

सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणूक काँग्रेसने लढवावी
Published on

PNE26W20604
मुंबई : विधान परिषद निवडणूक लढवण्याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना निवेदन देताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी.
........
विधान परिषद निवडणूक काँग्रेसने लढवावी
काकासाहेब कुलकर्णी यांची प्रदेशाध्यक्षांकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता २० : आगामी सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून अधिकृत उमेदवार देऊन निवडणूक लढवावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे केली आहे.
मागील विधान परिषद निवडणुकीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होती. मात्र, त्या निवडणुकीत उमेदवाराचा पराभव झाला होता. बदलत्या राजकीय परिस्थितीत नव्या रणनीतीची गरज स्पष्ट झाली असून, स्थानिक पातळीवरील जनाधार आणि संघटनशक्तीच्या आधारे काँग्रेसला संधी देणे योग्य ठरेल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

MLC Election 2026
Yavatmal
Ahmednagar Legislative Council Poll Sparks Intense Political Activity
Darade’s Chances Spark Political Buzz as Mahayuti Equations Intensify
Marathi News Esakal
www.esakal.com