नेत्यांच्या 'आऊटगोईंग'बद्दल काँग्रेस चक्क साखर वाटणार!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

वर्षानुवर्षे जागा अडवून बसलेले नेते पक्ष सोडून जाऊ लागल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या नेत्यांच्या जाण्यामुळे दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना संधी मिळणार असल्याने येत्या शुक्रवारी (ता. 6) या उत्सवाचे आयोजन केले आहे.

पुणे : वर्षानुवर्षे जागा अडवून बसलेले नेते पक्ष सोडून जाऊ लागल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या नेत्यांच्या जाण्यामुळे दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना संधी मिळणार असल्याने येत्या शुक्रवारी (ता. 6) या उत्सवाचे आयोजन केले आहे. प्रदेश काँग्रेसचे सचिव संजय बालगुडे यांनी याचे आयोजन केले आहे. 

काँग्रेसमध्ये राहून वर्षानुवर्षे सत्ता उपभोगून अनेक नेते भाजप- शिवसेनेत जात आहेत, त्यामुळे काँग्रेसमध्ये नैराश्‍याचे वातावरण पसरले असल्याचे चित्र रंगविले जात आहे. मात्र, वस्तुस्थिती तशी नाही. उलट त्यांच्या जाण्यामुळे काँग्रेस पक्ष प्रवाही होत आहे. दुसऱ्या फळीतील नेतृत्वाला संधी उपलब्ध होणार आहे. त्याचा आनंद साखर वाटून व्यक्त करण्यासाठी अभिनव चौकातील वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी सकाळी साडेदहाला हा कार्यक्रम होणार आहे. काँग्रेसचे एकनिष्ठ नेते मधुकर भावे आणि वसंतदादा पाटील यांचे जुने सहकारी आदी उपस्थित राहणार आहेत, असे बालगुडे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress workers are celebrating for leaders leaving the party