tapola ahir cable stayed bridge
sakal
- प्रसाद कानडे
पुणे - महाराष्ट्राचे ‘मिनी काश्मीर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तापोळ्याच्या सौंदर्यात आता एक मानाचा तुरा रोवला जात आहे. कोयनेच्या शिवसागर जलाशयावर उभा राहत असलेला ‘तापोळा-आहेर केबल-स्टेड’ पूल आता पूर्णत्वाच्या दिशेने आहे. येत्या मे मध्ये या पुलावरून दोन्ही बाजूने वाहतूक सुरू होणार आहे.