'मराठा समाजासह छत्रपती उदयनराजेंच्या फसवणुकीचे षड्यंत्र'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

: ''राज्यातील भाजप सरकारने मराठा आरक्षण आणि नोकरीभरतीबाबत मराठा समाजाला फसवले आहे. आता ते छत्रपती उदयनराजेंना फसवणार असल्याचा आरोप मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या राज्य समन्वयकांनी मंगळवारी (ता.२४) पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना केला.  ​

पुणे : ''राज्यातील भाजप सरकारने मराठा आरक्षण आणि नोकरीभरतीबाबत मराठा समाजाला फसवले आहे. आता ते छत्रपती उदयनराजेंना फसवणार असल्याचा आरोप मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या राज्य समन्वयकांनी मंगळवारी (ता.२४) पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना केला.        

 सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचं उदयनराजेंचा जाणीवपूर्वक पराभव करणार असल्याचा आरोप करत ते म्हणाले,  ''पण याद राखा,राजेंचा पराभव झाला तर, भाजप सरकरला त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. उदयनराजे मराठा समाजाची अस्मिता आहेत. त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आहे ''

या पत्रकार परिषदेला राज्य समन्वयक महेश डोंगरे, संजय सावंत, बबन सुद्रीक, भगवान माकने, सतीश वेताळ, लक्ष्मण शिरसाठ, दत्ता मोरे, अमित घाडगे, हरिभाऊ बोडके, गजानन देठे, राजेंद्र गरड, शरद गायकवाड, कांतीलाल गिरे, शिवराज जोगदंड, अजित जाधव आदी उपस्थित होते. 

नाशिकच्या सभेत उदयनराजेंचा अवमान करण्यात आला. पण, ते याबाबत बोलू शकत नाहीत. शिवाय मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांना विधानसभेची पायरी चढू देणार नाही. या विधानसभा निवडणुकीत भाजप विरोधात प्रचार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मराठा क्रांती ठोक मोर्चा कोणतीही निवडणूक लढणार नाही. जो कोणी समाजाचा नावावर निवडणूक लढवेल, त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा यावेळी देण्यात  आला. 

मराठा आरक्षण मागणी आंदोलनात  42 जणांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्या नातेवाईकांना सरकारी नोकरी आणि प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते.  प्रत्यक्षात ते अद्याप अंमलात आणलेले नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Conspiracy of Fraud with Chhatrapati Udayan Raje And Maratha community in VidhanSabha 2019