MNS Vasant More: वसंत मोरेंविरोधात पक्षांतर्गत षडयंत्र? नव्या घटनेवरुन व्यक्त केली जाहीर नाराजी

आपल्याविरोधात पक्षातील काही लोक षडयंत्र रचत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Vasant More
Vasant MoreEsakal

पुणे : मनसेचे सरचिटणीस वसंत मोरे पुन्हा एकदा पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळं नाराज असल्याची चर्चा आहे. त्याला कारणही तसंच आहे, राम नवमीनिमित्त मनसेच्यावतीनं आयोजित कार्यक्रमात मोरेंना डावलल्यानं त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. (Conspiracy within party against MNS leader Vasant More expressed displeasure over new incident)

Vasant More
Oscar winner team meets PM Modi : "भारताला तुमचा अभिमान"; PM मोदींनी ऑस्करविजेत्या टीमचं केलं कौतुक

काय घडलंय नक्की!

मनसेच्यावतीनं कसब्यात राम नवमीनिमित्त आरतीचं आयोजन करण्यात आलं आहे. पण यासाठीच्या निमंत्रणपत्रिकेत वसंत मोरे यांचं वगळण्यात आलं आहे. त्यामुळं मोरे नाराज झाले असून त्यांनी याबाबत पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चाही केली. "या कार्यक्रमासाठी जो बॅनर बनवण्यात आला आहे, त्यामध्ये शहर मनसेच्या कोअर कमिटीमधील ११ पैकी ९ जणांची नावं आहेत. मला यात विशेष याचं गोष्टीचं वाटलं की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कसब्यातील कार्यकर्ते प्रशांत यादव यांच्या उपस्थितीत ही आरती होणार आहे. बॅनरवर त्यांचं नाव टाकलं आहे. आरएसएसच्या कार्यकर्त्याचं मनसेच्या बॅनरवर नाव आहे, मग मनसेचा सरचिटणीस असलेल्या वसंत मोरेचं नाव त्यावर का नाही?" असा सवाल वसंत मोरे यांनी केला आहे.

हे ही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

वसंत मोरेंचा गंभीर आरोप

या गोष्टी कोणीतरी जाणूनबुजून तर करत नाही ना? असं मला वाटत याबाबत मी पदाधिकाऱ्यांशी बोललो आहे. एखाद्याला वाटतं असेल की आपण सुर्यावर झाकणं टाकू, पण त्यामुळं सूर्य उगवायचा राहत नाही. या गोष्टी त्यांना कळायला पाहिजेत. वारंवार या गोष्टी करायच्या आणि याची चर्चा घडवून आणायची हेच यामागं या लोकांचं षडयंत्र आहे, असा आरोपही यावेळी वसंत मोरे यांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com