मंचर - पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर तांबडेमळा-भोरवाडी (ता.आंबेगाव) येथे प्रथम सर्विस रस्ता तयार करा. त्यानंतरच रस्ता कॉंक्रिटीकरणाचे काम करा. येथे वारंवार अपघात होतात. अपघातामुळे दोन तरुणांचा मृत्यू झाला असून पाच जणांना कायमचे अपंगत्व आले आहे. न्याय हक्कासाठी आमचा लढा सुरु आहे.
पोलीस बळाचा वापर करून दबाव आणल्यास पुणे-नाशिक महामार्गावर गावकरी रास्ता रोको आंदोलन करतील. असा इशारा गावकर्यांनी दिली.