ग्राहकाची फसवणूक विकसकाला भोवली

ग्राहकाची फसवणूक
विकसकाला भोवली
Published on

पुणे, ता. ५ ः भूखंड खरेदीसाठी घेतलेली रक्कम प्रकल्प रद्द झाल्यानंतर परत करण्यासाठी दिलेले धनादेश न वटल्याने दिव्यांग ग्राहकाला मानसिक व आर्थिक त्रास देणे बांधकाम व्यावसायिकाला महागात पडले आहे. ग्राहक आयोगाने बांधकाम व्यावसायिकाला ग्राहकाचे उर्वरित दोन लाख ३६ हजार रुपये वार्षिक नऊ टक्के व्याजासहित परत करण्याचे आदेश दिले.
पुण्याच्या अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष डॉ. अरुण गायकवाड, सदस्या प्रणाली सावंत आणि कांचन गंगाधरे यांनी हा निकाल दिला. या प्रकरणात ग्राहकाला झालेला मानसिक त्रास आणि तक्रार खर्चाच्या भरपाईपोटी एकूण चाळीस हजार रुपये देण्याचे आदेशही आयोगाने बांधकाम व्यावसायिकाला दिले. या प्रकरणात चिंचवड येथील रहिवासी मधुसूदन प्रल्हाद जोशी यांनी श्री बालाजी डेव्हलपर्सचे मालक राजेश सूरजमल भंडारी यांच्याविरोधात ग्राहक आयोगात दाद मागितली होती. तक्रारदारांच्या वतीने ॲड. श्रीराम करंदीकर यांनी बाजू मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com