esakal | इंदापूर महाविद्यालयात कम्युनिटी रेडिओ उभारणीचे काम प्रगतीपथावर - हर्षवर्धन पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

harshvardhan patil

इंदापूर महाविद्यालयात कम्युनिटी रेडिओ उभारणीचे काम प्रगतीपथावर

sakal_logo
By
डॉ. संदेश शहा - सकाळ वृत्तसेवा

इंदापूर: इंदापूर महाविद्यालयात कम्युनिटी रेडिओ उभारणीचे काम प्रगतीपथावर असून इंदापूरकरांना लवकरच रेडिओ ऐकण्याची संधी मिळेल असे प्रतिपादन माजी सहकार मंत्री तथा इंदापूर तालुका शिक्षण प्रसारकमंडळाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केले.

हेही वाचा: नेहरूंच्या पंचवार्षिक योजनांमुळेच विकासाची पायाभरणी - जयंत पाटील

इंदापूर महाविद्यालयात दिवंगत खासदार कर्मयोगी शंकरराव पाटील समाधी स्थळाचे दर्शन हर्षवर्धन पाटील, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या उपाध्यक्षा पद्माताई भोसले, पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, निरा भिमा साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील, मंडळ खजिनदार अॅड. मनोहर चौधरी, सहसचिव प्रा. बाळासाहेब खटके, संचालक विलास वाघमोडे, आबा पाटील, पांडुरंग पाटील, अविनाश कोतमिरे, शेखर पाटील, विकास मोरे आदींनी घेतले.

इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने शंकरराव पाटील पुण्यतिथी निमित्त इयत्ता आठवी ते दहावी विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत ३५० विद्यार्थी सहभागी झाले होते. यशस्वी विद्यार्थ्यांना उपरोक्त मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, शंकरराव पाटील यांचे व्यक्तिमत्व ऋषीतुल्य असल्याचा अनेकांना अनुभव असून आमदार, राज्यमंत्री, राज्याचे कॅबिनेट मंत्री, पालकमंत्री, खासदार म्हणून त्यांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे. सामान्य माणूस विकासाचा केंद्रबिंदू मानून सहकाराच्या माध्यमातून त्यांनी मोठे आर्थिक परिवर्तन केल्याने ते तालुक्याचे भाग्यविधाते आहेत.

यावेळी दादासाहेब जावीर, बनसोडे, ओंकार जौंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली बाल गायकांनी भजनांचे सादरीकरण केले. सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर तर आभारप्रदर्शन प्राचार्य डॉ.संजय चाकणे यांनी केले.

loading image
go to top