

Pune Traffic
पुणे - शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी पुणे महापालिकेने आता पुन्हा एकदा सल्लागार नियुक्त केला आहे. पुढील तीन वर्षे हा सल्लागार शहरातील वाहतुकीच्या ‘रिअल टाइम ट्रॅफिक डेटा’वर काम करून वाहतूक सुधारणा सुचविणार आहे. यासाठी घोले रस्त्यावर स्वतंत्र कार्यालय सुरू केले जाणार आहे.