पुण्यात आता 'ही' सरकारी यंत्रणा होणार सुरु; ग्राहकांना मिळणार दिलासा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 July 2020

- गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ बंद होते कामकाज

- ग्राहक मंचाचे कामकाज अखेर सोमवारी सुरू होणार

पुणे : गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ बंद असलेले जिल्हा ग्राहक मंचाचे कामकाज अखेर सोमवारी सुरू होणार आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळात फसवणूक झाली असेल, अशा ग्राहकांना आता जिल्हा ग्राहक मंचात दाद मागता येणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

लॉकडाऊनमध्ये दिलेल्या काही सवलतीनंतर जिल्हा व सत्र न्यायालय, कौटुंबिक न्यायालय यांसह न्यायाधिकरणे इतर न्यायालयातील काम सुरू झाले आहे. मात्र मंचाचे कामकाज ऑनलाइन सुरु करायचे की ऑफलाइन याबाबत निर्माण झालेल्या गोंधळामुळे सुनावणी होण्यास उशीर झाला. ऑनलाइन कामकाजाबद्दल 2018 साली काढण्यात आलेल्या राज्य शासनाच्या अध्यादेशात राज्य आयोग मुंबई आणि औरंगाबाद व नागपूर परिक्रमा खंडपीठ व जिल्हा मंचाचाच उल्लेख आहे. त्यात पुणे परिक्रमा खंडपीठ व अतिरिक्त जिल्हा मंचाचा उद्देश नाही. त्यामुळे तो अध्यादेश पुण्याच्या परिक्रमा खंडपीठाला लागू होत नाही.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तसेच ऑनलाईन सुनावणी कामकाज सुरू करण्यासाठी पुरेशी यंत्रणा नसल्याने ऑफलाइनच काम चालावे, अशी मागणी वकील वर्गाकडून होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर तूर्तास एक दिवस ठरवून त्या दिवशी मंचाचे कामकाज होणार आहे. त्यानुसार 
फसवणूक झालेल्या ग्राहकांना 13 जुलै रोजी त्यांची तक्रार आता मंचात दाखल करता येणार आहे. प्रलंबित तक्रारी दाखल करून घेणे आणि दाखल पूर्व सुनावणी या दिवशी होणार आहे, अशी माहिती जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष उमेश जावळीकर यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Consumer Court will be Start from Monday in Pune