
पुणे - फसवणूक झालेला ग्राहक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे दाद मागतो. निकाल अनुकूल लागल्याने त्याला दिलासा मिळतो. सेवा पुरवठादाराला भरपाईचा आदेश मिळतो, पण त्याची अंमलबजावणी काही होत नाही. त्यामुळे ग्राहकाला आणखी एक लढा द्यावा लागतो. हा लढा निकालाच्या पूर्ततेसाठी असतो.