पुणे : अन् कंटेनरची रेल्वे ट्रॅकला धडक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 जानेवारी 2020

यावेळी  जड वाहनांना रात्री 11 वाजेनंतर परवानगी दिली जाते.  मात्र रात्री 9:30 ते 10 वाजल्यापासून या गाड्यांची रस्त्यावर वर्दळ सुरु असते.

कॅन्टोन्मेंट : जुना बाजार रेल्वे पुलाखाली कंटेनर धडकल्याने रेल्वे ट्रॅकला धोका संभवण्याची स्थिती निर्माण झाली आहे. रविवारी रात्री 10 वाजता ट्रान्सपोर्ट वाहतूक करणाऱ्या कंटेनरची उंची जास्त असल्याने हा कंटेनर रेल्वे ट्रॅकला धडकून पुलाखाली अडकला. त्यामुळे रेल्वे ट्रॅकला चांगलाच हादरा बसला आहे. तसेच काही काळ परिसरात वाहतूक विस्कळीत झाली होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, स्थानिक नागरिक, रेल्वे कर्मचारी व वाहतूक पोलिसांच्या मदतीने हा कंटेनर हलविण्यास मदत झाली. यावेळी रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे या घटना वारंवार घडत असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे स्थानिक नागरिक युसूफ शेख यांनी सांगितले.

संगमवाडीकडून शिवाजीनगर कोर्टाकडे येणारी जड वाहने नेहमी जुना बाजार व आरटीओ रेल्वेच्या पुलाखालून वाहतूक करत असतात. यावेळी  जड वाहनांना रात्री 11 वाजेनंतर परवानगी दिली जाते.  मात्र रात्री 9:30 ते 10 वाजल्यापासून या गाड्यांची रस्त्यावर वर्दळ सुरु असते.

पुण्यात सुरु झाले शिवभोजन? पाहा कोठे?

यावेळी मोठ्या उंचीच्या कंटेनरसारख्या वाहनांना या पुलाखालून जाण्यास बंदी आहे. मात्र तरी देखील कुठलेही नियम न बाळगता रात्री-अपरात्री ही वाहने भरधाव वाहतूक करतात.  दर दोन ते तीन दिवसाने अशी मोठी जड वाहने या पुलाला धडक देऊन अडकली जात असल्याचे बंडगार्डन वाहतूक शाखेचे  हवालदार जयवंत भालेराव यांनी सांगितले.

याप्रसंगी ट्रॅक मेन्टेनर विनोद कांबळे यांनी सांगितले की, ''आम्ही रेल्वे ट्रॅकवर लक्ष ठेवण्यासाठी रात्रपाळी करीत असतो, यावेळी वाहनचालकास आम्ही सांगितले की, हे वाहन पुलाखालून जाणार नाही, तरी देखील सर्व नियम धाब्यावर बसवून वाहनचालक मनमानी पद्धतीने वाहतूक करतात. अनेक वाहनचालक मद्यप्राशन करून वाहन चालवितात. अशा घटना वारंवार होत असल्याने आता त्रासदायकही ठरत आहे. अशा वाहनचालकांवर कारवाई व्हावी.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The container's hit the train track