Contaminated tap water Gokhale Nagar
Contaminated tap water Gokhale Nagarsakal

गोखलेनगर मध्ये नळाला दूषित पाणी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

दुषित पाण्यामुळे नागरिकांना गॅस्ट्रो , पोट दुःखीचे आजार

शिवाजीनगर : गोखलेनगर येथील अमर ज्योत मित्र मंडळाच्या बाजूला, चाळ नंबर तीन ते नऊ येथील रहिवाशांच्या नळाला दूषित पाणीपुरवठा होत असल्याने स्थानिक रहिवाशांनी महापालिकेच्या आयुक्तांना या संबंधी जानेवारी महिन्यात पत्राद्वारे तक्रार केली होती.तक्रार करुन तीन महिने उलटूनही प्रशासनानए दखल दखल घेतली नाही.

पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन खराब झाली असून जागोजागी छिद्र पडलेले आहेत. मैला मिश्रीत पाणी पिण्याच्या पाईप लाईन मध्ये मिसळून ते नागरिकांच्या घरोघरी येत आहेत.चेंबरचे काम करित असताना सदरील पाईप लाईन फुटली होती,त्या जागेवर तीन महिन्यांपूर्वी नवीन पाईप लाईन बसवून देखील जुन्याच पाईप लाईन मधून पाणी पुरवठा केला जात आहे.ठेकेदाराने पाईप लाईन व ड्रेनेज तोडल्याने त्यांच्यावर कारवाई करावी व स्वच्छ पाणीपुरवठा करावा यासाठी रहिवासी लक्ष्मण ताकवणे, एकनाथ मांजरेकर,शाम सातपुते,मदन कुडले यांनी पत्राद्वारे पाणीपुरवठा विभागाकडे मागणी केलेली आहे.

मी चाळ नंबर पाच रूम नं ४९ गोखलेनगर येथे राहतो.या भागात नोव्हेंबर २०२१ पासून पिण्याच्या पाण्यात ड्रेनेजचे पाणी म्हणजे मैला युक्त पाणी सातत्याने येत आहे. महापालिका आयुक्तांना तसेच सबांधित पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना पत्र दिले परंतु आजतागायत कोणी ही लक्ष दिले नाही. लहान मुले, जेष्ठ नागरिकांना गॅस्ट्रो, पोट दुःखीने आजार होऊ लागले आहेत.

- मदन कुडले रहिवासी गोखलेनगर

गोखलेनगर भागात चाळ नंबर एक ते दहा यामध्ये मागील दीड ते दोन महिन्यापासून घाण पाणी येते.या सबंधी पाणीपुरवठा अधिकारी कनिष्ठ अभियंता सुभाष खिलारे, उप अभियंता एकनाथ गाडेकर, अधिक्षक अभियंता प्रसन्न जोशी, अधिक्षक अभियंता अनिरुद्ध पावसकर या सर्वांकडे तक्रार करून देखील काही उपाययोजना केलेली नाही.याकडे प्रशासनाने लक्ष देऊन स्वच्छ पाणीपुरवठा करावा.

- शाम सातपुते रहिवासी गोखलेनगर.

सदरील समस्या सोडवली होती.परंतू ड्रेनेजमुळे घाण पाणी पुन्हा दोन तीन घरात येत असेल. किती घरामध्ये दूषित पाणी येते हे तपासतो.

- सुभाष खिलारे कनिष्ठ अभियंता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com