
पुणे : शहरात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका धायरी गाव, डीएसके विश्व भागाला बसला आहे. या भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या बारांगणे मळ्यातील विहिरीला नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. हे घाण पाणी विहिरीत गेल्याने जलस्रोत दूषित झाला आहे. त्यामुळे हे पाणी उपसा करून बाहेर काढून विहीर स्वच्छ केली जाणार असल्याने या भागात दोन दिवस पाणीपुरवठा होणार नसल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.