
कोथरूड : कोथरूडमधील भुसारी कॉलनीत असलेल्या धनलक्ष्मी पार्कमध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक आजारी पडत आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांना पिण्याचे पाणी विकत आणावे लागत आहे. महापालिका प्रशासनाने या समस्येवर त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.