
पुणे : शहरात सेवा वाहिन्या टाकल्यानंतर रस्ते दुरुस्त करताना ठेकेदारांकडून नियमानुसार काम केले जात नसल्याचे जागोजागी रस्ते खचण्याचे प्रकार घडत आहेत. असाच प्रकार धायरी येथे समोर आला असून, समान पाणीपुरवठा योजनेचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीला महापालिकेने एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.