
लोणी काळभोर (पुणे) : कुलू मनालीला बॅगा भरुन सहलीसाठी मोठ्या उत्साहात निघालेल्या नऊ जोडप्यांपैकी पाच जणांचे कोरोना अहवाल तेही एकाच शासकीय प्रयोगशाळेत परस्परविरोधी आल्याचा धक्कादायक प्रकार पुर्व हवेलीत उघडकीस आला आहे. अवघ्या चोवीस तासांच्या आत आलेल्या कोरोनाच्या परस्परविरोधी अहवालामुळे नऊ जोडप्यांना ऐनवेळी कुलू मनालीचा बेत रद्द करण्याच्या आर्थिक भुर्दंडाबरोबरच, मानसिक ताणतणावाला सामोरे जावे लागले. ही घटना पुर्व हवेली घडली.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कुलू मनालीला निघालेल्या नऊही जोडप्यांनी कोरोनाची चाचणी जिल्हा परीषदेच्या अधिकृत सेंटरवर केली असल्याने, नेमका कोणत्या सेंटरवरील कोरोना अहवाल खरा धरावयाचा याची खात्री करण्यासाठी वरील पाचही व्यक्ती मागील पाच दिवसांपासून प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या आरोग्य अधिकाऱ्यापासून पंचायत समितीच्या वरीष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांच्या भेटी घेत आहेत. मात्र एकही अधिकारी वरील पाच जणांचे समाधान करु शकलेला नाही.
पुण्यातील एका नामांकित प्रवाशी कंपनीच्या माध्यमातून लोणी काळभोर, शेवाळेवाडी, फुरसुंगी व कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील नऊ जोडप्यांनी दहा दिवसांसाठी कुलू मनाली येथे दोन महिण्यापुर्वी सहलीचे नियोजन केले होते. सहलीसाठी येणाऱा खर्चही वरील नऊ जोडप्यांनी रितसर प्रवाशी कंपनीकडे भरला होता. मात्र सहलीला निघण्यापुर्वी कोरोनाची स्वॅब चाचणी सक्तीचे असल्याने, वरील नऊ जोडप्यांनी आपआपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन स्वॅबची तपासणी केल्या. यात अठरापैकी पाच जण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले.
दरम्यान, कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या पाचही जणांना कसलाही त्रास अथवा कोरोनाची लक्षणे जानवत नसल्याने, वरील पाचही जनांनी कोरोना चाचणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र बदलून, स्वॅब दिले. आणि आश्चर्य म्हणजे पाचही जणांचे अहवाल चक्क निगेटीव्ह आले. वरील पाचही जणांनी कोरोनाच्या चाचण्या शासकीय प्रयोगशाळेत केल्याने, नेमका कोणत्या सेंटरवरील कोरोना अहवाल खरा धरावयाचा याबद्दल संशय निर्माण झाला. या घाईगडबडीत वरील नऊही जोडप्यांनी कुलू मनालीचा बेत मात्र रद्द केला.
दरम्यान वरील नऊ जोडप्यांच्या वतीने अधिक माहिती देताना आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) येथील लक्ष्मण भोंडवे म्हणाले, आमच्या काही मित्रांनी नऊ दिवसांच्यासाठी कुलू मनाली सहलीचा बेत आखला होता. सहलीपुर्वी कोरोना चाचणी बंधनकारक असल्याने, वरील अठरा जणांनी आपआपल्या हद्दीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वॅब दिले होते. याच वरील अठरापैकी पाच जण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले. मात्र वरील पाचही व्यक्तींना कोरोना संदर्भातील कोणत्याही प्रकारची लक्षणे नसल्याने, वरील पाच जणांनी दुसऱ्या दिवशी प्राथमिक केंद्राची आदलाबदल करुन चाचण्या केल्या. यात मात्र वरील पाचही जण चक्क निगेटीव्ह असल्याचे आढळून आले. मात्र या घाईगडबडीत अठराही जणांनी सहल रद्द करण्याचा निर्णय घेतला. ऐनवेळी सहल रद्द केल्याने, पैसे परत मिळालेच नाहीत. मात्र वरील परस्परविरोधी अहवालामुळे पाचही जणांना मोठ्या मानसिक संकटाला तोंड द्यावे लागले.
कोरोनाचे परस्परविरोधी अहवाल मिळणे ही बाब नविन राहिलेले नाही. स्वॅब घेत असताना, घशातील स्वॅबचे प्रमाण कमी जास्त होत असल्याने, कदाचित वरील पाच जणांचे कोरोना अहवाल परस्परविरोधी आले असतील, आम्ही नाकारत नाहीत. मात्र यात आमच्या खात्यामधील कोणाचीही चुक नाही. -डॉ. सचिन खरात (तालुका आरोग्य अधिकारी, हवेली पंचायत समिती)
(संपादन : सागर डी. शेलार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.