
कॉलेज ऑफ नर्सिंगच्या ५२ व्या तुकडीचा दिक्षान्त सोहळा उत्साहात संपन्न
पुणे: येथील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाच्या (एएफएमसी) कॉलेज ऑफ नर्सिंगच्या ५२ व्या तुकडीचा दिक्षान्त सोहळा मंगळवारी उत्साहात संपन्न झाला. कॅप्टन देवाशिष शर्मा परेड ग्राउंड येथे झालेल्या या कार्यक्रमात ३५ नर्सिंग पदवीधरांना मिलिटरी नर्सिंग सेवांमध्ये (एमएनएस) अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले.
हेही वाचा: छत्रपती संभाजीराजेंच्या उपोषणाला भाजपचा पाठिंबा
एएफएमसीच्या संचालक व प्रमुख लेफ्टनंट जनरल राजश्री रामसेथू यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर वरिष्ठ अधिकारी, शिक्षक आणि पालकांनी ऑनलाइन माध्यमातून कार्यक्रमात सहभाग घेतला.यावेळी लेफ्टनंट जनरल रामसेथू म्हणाल्या, ‘‘शांततेचे भाग, अवघड प्रदेश, बंडखोरीचे क्षेत्र, संयुक्त राष्ट्र उपक्रम अशा विविध भागांमध्ये असलेल्या लष्करी रुग्णालयांत सैन्य आणि त्यांच्या कुटुंबीयांची काळजी घेत आहे. कोरोना काळात ही सशस्त्र दल वैद्यकीय सेवांमध्ये त्यांचे योगदान होते. नव्याने नियुक्त झालेल्या नर्सिंग अधिकाऱ्यांनी देखील स्वतःला समर्पित करत सेवा कार्य करावे.
हेही वाचा: छत्रपती संभाजीराजेंच्या उपोषणाला भाजपचा पाठिंबा
तसेच संरक्षण सेवांसाठी एमएनएसच्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांसाठी प्राचार्य ब्रिगेडियर सुभाषिनी के आर आणि नर्सिंग कॉलेजच्या प्राध्यापकांचे कौतुक केले.
प्रशिक्षणादरम्यान उत्तरीर्ण कामगिरी केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना यावेळी लेफ्टनंट जनरल रामसेथू यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांकासाठी लेफ्टनंट केशिया साजी हिला ‘लेफ्टनंट जनरल के एस मास्टर मेमोरिअल सिल्व्हर मेडल’ आणि ‘सिल्व्हर ज्युबिली रोलिंग ट्रॉफी’ प्रदान करण्यात आली. सर्वोत्कृष्ट अष्टपैलू नर्सिंग विद्यार्थी म्हणून ‘जनरल करिअप्पा रोलिंग ट्रॉफी’ लेफ्टनंट हरिथा ई के हिला प्राप्त झाले.
Web Title: Convocation Ceremony 52nd Battalion College Nursing Concluded
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..