सहकारी कारखान्यांची गाळप, उताऱ्यात आघाडी

सहकारी कारखान्यांची गाळप, उताऱ्यात आघाडी
Published on: 

पुणे, ता. १७ : जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांनी खासगी कारखान्यांच्या तुलनेत अधिक उसाचे गाळप आणि साखरेचे उत्पादन केले असून, निव्वळ साखर उताराही अधिक नोंदविला आहे. सहकारी कारखान्यांचा सरासरी उतारा ९.८८ टक्के तर खासगी कारखान्यांचा ८.७१ टक्के आहे. जिल्ह्यातील १३ कारखान्यांनी आतापर्यंत ३५ लाख ५२ हजार टन उसाचे गाळप करून ३३ लाख १५ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.

जिल्ह्यातील कारखान्यांच्या गाळपात सहकारी कारखान्यांचा वाटा अधिक आहे. आठ सहकारी कारखान्यांनी मिळून १८ लाख ९८ हजार ५४५ टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून १८ लाख ७५ हजार ९५५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सहकारी कारखान्यांचा सरासरी निव्वळ साखर उतारा ९.८८ टक्के आहे. दुसरीकडे, पाच खासगी कारखान्यांनी १६ लाख ५३ हजार ६२५ टन उसाचे गाळप करून १४ लाख ३९ हजार ९६४ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. खासगी कारखान्यांचा सरासरी निव्वळ साखर उतारा ८.७१ टक्के आहे.

बारामती ॲग्रोने गाळप आणि साखर उत्पादनात जिल्ह्यात आघाडी घेतली आहे. या कारखान्याने सहा लाख २३ हजार ९५१ टन उसाचे गाळप करून पाच लाख २७ हजार ८३२ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. त्यापाठोपाठ दौंड शुगरने पाच लाख २५ हजार २८० टन उसाचे गाळप केले आहे. मात्र, या कारखान्याचा निव्वळ साखर उतारा ८.२५ टक्के असून, तो जिल्ह्यातील कारखान्यांमध्ये सर्वांत कमी आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने तीन लाख ३१ हजार ९५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले असून, त्याचा निव्वळ साखर उतारा ११.०६ टक्के आहे. माळेगाव कारखान्याचा उतारा १०.१५ टक्के, भीमाशंकरचा १०.१० टक्के, तर श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याचा १०.६३ टक्के आहे. या चार कारखान्यांनी दहा टक्क्यांपेक्षा अधिक निव्वळ साखर उतारा नोंदविला आहे.


कारखानानिहाय गाळप, उत्पादन आणि निव्वळ साखर उतारा
कारखाना -- गाळप (टन) -- उत्पादन (क्विंटल) -- उतारा (टक्के)
नीरा-भीमा सहकारी -- १,७६,७२० -- १,५६,९७० -- ८.८८
बारामती ॲग्रो -- ६,२३,९५१ -- ५,२७,८३२ -- ८.४६
दौंड शुगर -- ५,२५,२८० -- ४,३३,३०० -- ८.२५
साईप्रिया-भीमा सहकारी -- ३,१८,४१३ -- ३,११,८५० -- ९.७९
माळेगाव सहकारी -- २,७५,७७५ -- २,७९,८०० -- १०.१५
व्यंकटेश कृपा -- १,५९,६८० -- १,४१,६०० -- ८.८७
सोमेश्वर सहकारी -- ३,००,०३५ -- ३,३१,९५० -- ११.०६
संत तुकाराम सहकारी -- ८०,५४५ -- ७६,०२५ -- ९.४४
विघ्नहर सहकारी -- २,६५,७५० -- २,४४,२०० -- ९.१९
पराग ॲग्रो -- १,८३,९८९ -- १,६६,३६७ -- ९.०४
श्रीनाथ म्हस्कोबा सहकारी -- १,६०,७२५ -- १,७०,८६५ -- १०.६३
श्री छत्रपती सहकारी -- २,६९,९०७ -- २,६१,६६० -- ९.६९
भीमाशंकर सहकारी -- २,११,४०० -- २,१३,५०० -- १०.१०
एकूण -- ३५,५२,१७० -- ३३,१५,९१९ -- ९.३३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.