

Massive Cable Theft at Yedgaon Dam: 40 Agricultural Water Pumps Targeted
Sakal
नारायणगाव: येडगाव धरण जलाशयात असलेल्या इंदिरानगर परिसरातील 40 कृषी विज पंपांच्या सुमारे आठ हजार फूट लांबीच्या केबल अज्ञात चोरट्यांनी आज पहाटेच्या सुमारास चोरून नेल्या. शेती पिकांना सिंचन करण्यासाठी कृषी पंपांना जोडणी करण्यासाठी नवीन केबल खरेदी कराव्या लागणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना एकूण सुमारे दहा लाख रुपयांचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. 8 फेब्रुवारी 2026 रोजी येथील खंडोबा माळ परिसरातील 40 कृषी पंपांच्या केबल चोरीला गेल्या होत्या. या चोरीचा तपास अद्याप लागला नसतानाच पुन्हा या भागात चोरीची दुसरी घटना झाली आहे.सातत्याने होत असलेल्या केबल चोरीमुळे शेतकरी हतबल झाले आहेत.