Narayangaon News : उच्चांकी बाजारभावाच्या लॉटरीमुळे कोथिंबीर, मेथी उत्पादक मालामाल

नारायणगाव येथील उपबाजारात खरेदी-विक्रीतून ९ कोटी ७७ लाख रुपयांची विक्रमी उलाढाल.
coriander
coriandersakal
Updated on

नारायणगाव - उच्चांकी बाजारभाव मिळाल्याने कोथिंबीर, मेथी, शेपूच्या, कांदा पात उत्पादक शेतकऱ्यांना ऑगस्ट महिना लकी ठरला आहे. काही शेतकऱ्यांना एकरी चार ते पाच लाख रुपयांचा नफा झाला मात्र बहुतेक उत्पादकांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील उपबाजार आवारात ऑगस्ट महिन्यात खरेदी विक्रीतून तब्बल ९ कोटी ७७ लाख २१ हजार ८२० रुपयांची विक्रमी उलाढाल झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com