रांजणगाव गणपती येथे कोरोनाचा धोका वाढला... 

corona
corona

तळेगाव ढमढेरे (पुणे) : शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे पूर्वीच्या तीन स्थानिक रुग्णाबरोबरच आज आणखी एका ३१ वर्षीय पुरुषाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून, त्याच्या संपर्कातील २२ लोकांना होम क्वारंटाइन केले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश सातव यांनी सांगितली. 

रांजणगाव गणपती येथे २५ जून रोजी एक व २६ जून रोजी दोन, असे एकूण ३ रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यांच्यावर पुणे येथे उपचार चालू असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. या तीन रुग्णामुळे प्रांताधिकाऱ्यांनी ९ जुलैपर्यंत रांजणगाव प्रतिबंधित व बफर क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. मात्र, आज आणखी एका स्थानिक पॉझिटिव्ह रुग्णाची भर पडली असून, त्याच्यावर पुण्यात उपचार चालू आहेत. आता रांजणगावात एकूण ४  स्थानिक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे डॉ. सातव यांनी सांगितले. 

दरम्यान, रांजणगाव गणपती येथे कोरोनाचे चार रुग्ण असल्याने प्रशासनाने सर्व खबरदारी घेतली असून, लॉकडाउन कडक केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. नागरिकांनी तोंडाला मास्क लावावा, अन्यतः ५०० रुपये दंड आकारण्याचा फतवा प्रशासनाने काढला आहे. लॉकडाउनचे सर्व नियम काटेकोर पाळून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच सर्जेराव खेडकर, उपसरपंच अजय गलांडे व ग्रामविकास अधिकारी किसन बिबे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com