esakal | बारामतीत कोरोना रुग्णसंख्या कमी न झाल्यास होणार कठोर निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

ajit pawar baramati

बारामतीत गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या कमालीच्या वेगाने वाढली.

बारामतीत कोरोना रुग्णसंख्या कमी न झाल्यास होणार कठोर निर्णय

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती : कोरोना रुग्णांचा बारामतीतील वाढता आकडा चिंताजनक आहे, येत्या 2 एप्रिलपर्यंत बारामतीतील आकडा कमी झाला नाही तर कठोर निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. कटू निर्णय घेण्याची वेळ येऊ नये या साठी सर्वांनी नियमांचे पालन करुन शासनास सहकार्य करण्याचे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे. बारामतीत गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या कमालीच्या वेगाने वाढली. प्रशासनाने राज्य शासनाच्या सूचनेनुसार तपासण्यांची संख्या वाढवली. बारामतीतील तपासणीचा आकडा दिवसाला पाचशेहून अधिकचा होऊ लागल्याने रुग्णांचीही संख्या झपाट्याने वाढली होती. 

हेही वाचा - बारामतीत रुई रुग्णालयातही आता तयार होणार ऑक्सिजनचे 100 बेड्स

प्रशासनाने कोरोनावर मात करण्यासाठी संध्याकाळी सात ते सकाळी नऊपर्यंत सर्व व्यवहार बंद करण्याचाही निर्णय घेतला. दुसरीकडे बारामती नगरपालिकेने घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचाही निर्णय घेतला, आजवर 89 हजार नागरिकांची तपासणी नगरपालिकेने केली. काही विभाग प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणूनही जाहिर करण्यात आले, आठवडा बाजार बंद करण्याचा निर्णय झाला. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून हळुहळू आकडा खाली येत आहे. असे असले तरी वेगाने वाढणारा आकडा हा चिंतेचा विषय असल्याने येत्या दोन तारखेपर्यंत प्रशासनाकडून परिस्थितीचा अंदाज घेतला जाणार आहे. जर रुग्णांचा आकडा कमी झाला तर बारामतीकरांना दिलासा मिळू शकतो, मात्र आकडा वाढला तर काही प्रमाणात काही कठोर उपाययोजना अंमलात आणाव्या लागतील असे आता चित्र तयार झाले आहे. 

हेही वाचा - जुन्नरची मंत्रा ठरली समुद्रात विक्रमवीर!

शरद पवार रेडीमेसेव्हरसाठी मदत करणार
दरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार हे आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील रुग्णांना रेडीमेसेव्हर इंजेक्शनसाठी मदत करणार असल्याची माहिती आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. मागील काळातही पवार यांनी ही इंजेक्शन्स उपलब्ध करुन दिली होती. 

loading image