संशोधन करा पण, विद्यापीठात राहू नका

कोरोनामुळे वसतिगृह बंद; संशोधक विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय
संशोधन करा पण, विद्यापीठात राहू नका

पुणे : शहरातील सर्वच राष्ट्रीय संशोधन संस्थांची वसतिगृहे संशोधक विद्यार्थ्यांसाठी खुली झाली आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वसतिगृहे अजूनही संशोधक विद्यार्थ्यांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे संशोधक विद्यार्थ्यांना, विशेष करून विद्यार्थिनींना निवासासंबंधी अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, त्याचा परिणाम संशोधनावरही होत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच संशोधन संस्थांची वसतिगृहे बंद करण्यात आली होती. आपत्तीच्या काळात संशोधनाची निकट पाहता आवश्यक ती सर्व काळजी घेत राष्ट्रीय संशोधन संस्थांची वसतिगृहे खुली करण्यात आली आहे. विद्यापीठातही संशोधन चालू आहे, मात्र संशोधक विद्यार्थ्यांची वसतिगृहे बंद आहेत. विज्ञान विद्याशाखेतील श्रुती राऊत (नाव बदललेले) म्हणते,‘‘विभागात पीएच.डी.चे काम सुरू झाले तरी वसतीगृह बंद असल्यामुळे पुण्यात राहायचे कुठे हा प्रश्न होता. आठ महिने वाट पाहिल्यानंतर शेवटी मी सांगवी भागात खोली भाड्याने घेऊन राहत आहे. मला सध्या कोणतीही शिष्यवृत्ती नाही. त्यामुळे आर्थिक झळ सोसून मला बाहेर रहावं लागत आहे.’’ श्रुती सारख्या अनेक विद्यार्थिनींना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आहे. यासंबंधी विद्यापीठातील संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

संशोधन करा पण, विद्यापीठात राहू नका
पुणे मेट्रोच्या पहिल्या 'ट्रायल रन'ला उपमुख्यमंत्र्याचा हिरवा कंदील, पाहा फोटो

वसतिगृहांची आवश्यकता का?

  • पीएच.डी.चे किंवा संशोधनाचे काम चालू पण राहण्याची व्यवस्था नाही

  • काही संशोधक विद्यार्थ्यांना कोणतीही शिष्यवृत्ती नाही, त्यामुळे बाहेर राहणे आणि प्रवासाच्या खर्चात वाढ

  • लॉकडाउनमुळे आधीच पीएच.डी.च्या संशोधनाला उशीर झाला आहे

  • काही प्रयोगांना १२ तासापेक्षा जास्त कालावधी लागतो, अशा वेळी रात्री-अपरात्री विद्यापीठाबाहेर पडल्यास सुरक्षेचा प्रश्न

  • संशोधक विद्यार्थिनींना विद्यापीठात सुरक्षीत वातावरण, तसे परवडणाऱ्या दरात सुविधा उपलब्ध होतात

  • या सर्व असुविधेमुळे संशोधनाला उशीर होत आहे

आकडे बोलतात....

१) संशोधक विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची क्षमता (अंदाजे)

मुले ः १५०

मुली ः १५०

२) विद्यापीठातील विभागांमधील पुर्णवेळ संशोधक विद्यार्थी (अंदाजे)

- ५०० पेक्षा जास्त

संशोधन करा पण, विद्यापीठात राहू नका
Metro Trial Run हा पुणेकरांच्या कष्टाचा, स्वप्नपुर्तीचा प्रवास : अजित पवार

''शहरातील इतर सर्व संस्थांनी संशोधक विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरू केली आहेत. आम्ही पण विद्यापीठातील वसतीगृह प्रशासनाला विनंती केली आहे. बाहेर राहायचे म्हटलं तर खर्च खूप आहे. तो परवडत नाही. तसेच बऱ्याचवेळा रात्री पर्यंत प्रयोग चालतात. आता दीड वर्षे होऊन गेले आहे. संशोधक विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह खुले करावे.''

- राजेश जाधव (नाव बदललेले), संशोधक विद्यार्थी

''पीएच.डी.च्या कामाला लॉकडाउनमुळे उशीर झाला आहे. त्यात इथे वसतीगृह बंद असल्यामुळे अधिकच समस्यांना सामोरे जावे लागते. मुलगी म्हणून विद्यापीठाबाहेर राहणे परवडतच नाही. त्याचबरोबर सुरक्षेचा प्रश्नही तयार होतो. यावर प्रशासनाने विचार करायला हवा. ''

- माधवी बाणाईत (नाव बदललेले) संशोधक विद्यार्थिनी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com