Corona Patients | पुणे जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढू लागला; १८४ नवे कोरोना रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Patient
पुणे जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढू लागला; १८४ नवे कोरोना रुग्ण

पुणे जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढू लागला; १८४ नवे कोरोना रुग्ण

पुणे - पुणे जिल्ह्यात गुरुवारी (ता.९) दिवसभरात १८४ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील दिवसातील एकूण रुग्णांत पुणे शहरातील ६८ रुग्ण आहेत. अन्य दोन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यापैकी एक मृत्यू पुणे शहरातील आणि एक मृत्यू हा जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील आहे.

गुरुवारी दिवसभरात शहरातील ६८ रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमधील ५४, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ५१, नगरपालिका हद्दीतील नऊ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील दोन रुग्ण आहेत. दरम्यान, गेल्या २४ तासांत १५७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ५१ जण आहेत. पिंपरी चिंचवडमधील ६३, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ३०, नगरपालिका हद्दीतील नऊ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील चार जण कोरोनामुक्त झाले आहेत.

हेही वाचा: लक्ष्मी रस्त्यावर शनिवारी (ता.11) "वॉकींग प्लाझा'', वाहतुकीत बदल

सद्यःस्थितीत पुणे जिल्ह्यात एकूण १ हजार ७१५ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. जिल्ह्यातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी ५८८ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. उर्वरित १ हजार १२७ जण गृह विलगीकरणात आहेत. एकूण सक्रिय कोरोना रुग्णांमध्ये पुणे शहरातील ७९२ रुग्णांचा समावेश आहे. शहरातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी २८३ जणांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू असून, उर्वरित ५०९ जण गृहविलगीकरणात आहेत.

Web Title: Corona Count Increase In Pune District

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Coronavirus