पुण्यात 61-70 वयोगटातील सर्वाधिक रुग्णांचा कोरोनाने मृत्यू; पुरुषांचे प्रमाण अधिक

Corona Pun
Corona Pun
Updated on

पुणे : कोरोनामुळे पुणे जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या एकूण मृत्यूंपैकी सर्वाधिक २ हजार ९३६ मृत्यू हे ६१ ते ७० वयोगटातील रुग्णांचे झाले आहेत. जिल्ह्यात २९ मार्च २०२१ पर्यंत एकूण ९ हजार ८७३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूंमध्ये ६ हजार ८१५ पुरुष रुग्णांचा तर, ३ हजार ५७ महिला रुग्णांचा समावेश आहे. कोरोना मृत्यूमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. जिल्‍हा आरोग्य विभागाच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या कोरोना रुग्ण मृत्यू अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे. सर्वाधिक मृत्यू होणाऱ्या रुग्णांमध्ये ५१ ते ६० वयोगटातील रुग्ण दुसऱ्या तर, ७१ ते ८० वयोगटातील रुग्ण हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. यानुसार ५१ ते ६० वयोगटातील २ हजार १४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी १ हजार ४३८ पुरुष रुग्ण तर, ७०३ महिला रुग्ण आहेत. मृत्यूमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या ७१ ते ८० वयोगटातील २ हजार ८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १ हजार ४५१ पुरुष रुग्णांचा तर, ६३४ महिला रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, १०० वर्षापेक्षा अधिक वयोगटात सर्वात कमी म्हणजे केवळ सहा मृत्यू हे कोरोनाने झाले आहेत. यामध्ये प्रत्येकी तीन पुरुष आणि महिला रुग्णांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यात झालेल्या एकूण मृत्यूंमध्ये पुणे शहरातील ५ हजार ४१२, पिंपरी चिंचवडमधील १ हजार ९७७ आणि ग्रामीण भागातील (जिल्हा परिषद, नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील हद्दीसह) २ हजार ४८४ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील एकूण मृत्यूंपैकी जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १ हजार ७०६, नगरपालिका क्षेत्रात ५७६ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात २०२ मृत्यू आहेत.

  • वयोगट            एकूण मृत्यू
  • 0 ते 10 वर्षे           12
  • 11 ते 20 वर्षे          20
  • 21 ते 30 वर्षे        154
  • 31 ते 40 वर्षे        517
  • 41 ते 50 वर्षे      1183
  • 51 ते 60 वर्षे      2141
  • 61 ते 70 वर्षे      2936
  • 71 ते 80 वर्षे      2085
  • 81 ते 90 वर्षे        731
  • 91 ते 100 वर्षे       88
  • 100 वर्षाहून अधिक 06

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com