बारामतीतील ३३ जणांची कोरोना तपासणी 

संतोष आटोळे 
Wednesday, 6 May 2020

बारामती एमआयडीसी परिसरालगत असलेल्या कटफळ गावात कोरोनाबाधित रुग्ण सापडला. ​

शिर्सुफळ (पुणे) : बारामती तालुक्यातील कटफळ येथे ५ मे रोजी कोरोना पाझिटीव्ह रुग्ण आढळल्यानंतर संबंधित गाव परिसर सील करण्यात आला आहे. खबरदारी म्हणून रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कटफळ व परिसरातील २१ व रुग्ण अॅडमिट असलेल्या बारामती शहरातील रुग्णालयातील १२, अशा एकूण ३३ जणांची आज (ता. ६) चाचणी घेण्यात आली आहे. आता या भागातील ग्रामस्थांना अहवालाची प्रतिक्षा लागली आहे. संबंधित ७९ वर्षीय रुग्णांवर मुंबईत उपचार सुरु आहेत. 

मुळशीत पित्याचा डोक्यात बॅट घालून खून 

बारामती एमआयडीसी परिसरालगत असलेल्या कटफळ गावात कोरोनाबाधित रुग्ण सापडला. पुणे जिल्ह्यात एमआयडीसी सुरु करण्यास जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सोमवारी (ता. ४) परवानगी दिली. मात्र, दुसऱ्याच दिवशी परिसरातील गावात कोरोनाबाधित रुग्ण सापडला. त्यामुळे कटफळसह एमआयडीसी परिसर सील होण्याची टांगती तलवार उद्योगांवर होती. मात्र, ‘कंटेन्मेंट झोन’मधून हा परिसर वगळला. त्यामुळे एमआयडीसी सुरू ठेवण्यात आली. 

कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यावर कटफळ गाव 'बफर झोन' म्हणून घोषित करण्यात आला. आज सापडलेल्या रुग्णामुळे उद्योग सुरू करण्याची गणिते बदलण्याची भीती उद्योजकांना होती. तसेच, अनेक महत्त्वाच्या कंपन्या याच परिसरात आहेत. मात्र, एमआयडीसी परिसर ‘कंटेन्मेंट झोन’मधून वगळण्यात आला. त्यामुळे उद्योग सुरू आहेत.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

गावात कोरोना रुग्ण आढळल्याने आदर्श ग्राम असलेल्या कटफळ ग्रामपंचायतीच्या वतीने तत्काळ गावात औषध फवरणी, स्वच्छता मोहिम, ग्रामस्थांमध्ये जागृतीसाठी फलक, स्पिकररून सुचना दिल्या. गाव परिसर बंद करण्यात आले. तसेच, घाबरून न जाता खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आल्याचे सरपंच सारिका भारत मोकाशी व ग्रामसेवक महेंद्र बेंगारे यांनी सांगितले. 

गावातील प्रत्येकाची आरोग्य तपासणी 
शिर्सुफळ प्राथमिक आरोग्य केंद्राचा माध्यमातून आरोग्य कर्मचारी व शिक्षक यांच्याकडून गावातील प्रत्येक कुटुंबाला भेटी देत त्यांची माहिती घेण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांची माहिती संकलित करण्यात आली. परगावाहून आलेल्या ग्रामस्थांना जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाइन करण्यात आले, अशी माहिती वैद्यकिय अधिकारी डॉ. मनोज चौधरी यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona examination of 33 persons from Baramati