खेड तालुक्यात कोरोनाचे त्रिशतक, एकाच दिवसात 38 रुग्ण 

राजेंद्र सांडभोर
शुक्रवार, 10 जुलै 2020

खेड तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येने त्रिशतक गाठले आहे. एकूण संख्या ३३० झाली आहे.

राजगुरूनगर (पुणे) : खेड तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येने त्रिशतक गाठले आहे. एकूण संख्या ३३० झाली आहे. गेल्या अवघ्या ४ दिवसात कोरोनाबाधितांची संख्या ११४ ने वाढली आहे.

खेड तालुक्यातील राजगुरुनगर, चाकण  व आळंदी या शहरांमध्ये कोरोनाबाधित वाढत चालल्याने चिंता अधिकच वाढली आहे. आज तालुक्यात तब्बल ३८ रुग्णांची भर पडली. आज आळंदीला ९, चाकणला ६, राजगुरूनगरला ४ रुग्ण आढळले आहेत. चिंबळी आणि वाकी खुर्द प्रत्येकी ३ जण; तर नाणेकरवाडी आणि निघोजे येथे प्रत्येकी २ जण पॉझिटिव्ह आले. शेलू, येलवाडी, गोसासी, खराबवाडी, वाकी बुद्रुक, मेदनकरवाडी, वडगाव घेणंद, चऱ्होली खुर्द, काळूस येथे प्रत्येकी एकजण कोरोनाबधित आढळला आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

खेड तालुक्यात १५ मे रोजी १ रुग्ण होता. नंतर १८ जून रोजी ५१, २९ जून रोजी १०३, ३ जुलै रोजी १५१, तर ६ जुलै रोजी २१६ रुग्ण आणि ८ जुलै रोजी २५९ झाले होते. हा क्रम पाहता दरदिवशी रुग्णसंख्येचा वेग वाढतानाच दिसत आहे. त्यामुळेच तालुका लॉकडाउन करण्याची मागणी वाढत होती. मात्र, मोठी शहरे वगळता इतरत्र व्यव्हार सुरू आहेत. सध्या कंपनी संपर्कातून रुग्ण वाढू लागल्याने चिंता वाढली आहे.  

Edited by : Nilesh Shende 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona grew in Khed taluka Another 38 patients