कटफळ येथे कोरोनाग्रस्त रुग्ण सापडला; पण...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 May 2020

रुग्ण नेमका कोणाच्या हद्दीत

सदरच्या रुग्णावर मुंबईत उपचार व निदान झालेले असल्याने तो पुणे विभागात गृहीत धरायचा की मुंबईत याबाबत प्रशासनाच्या वतीने विचारविनिमय सुरु असल्याचेही समजले. 

बारामती : तालुक्यातील कटफळ येथे कोरोनाचा रुग्ण सापडला आहे. अर्थात हा रुग्ण बारामती शहरातील नसल्याने बारामती शहराच्या स्थितीवर याचा परिणाम होणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तालुक्यातील कटफळ येथील एका 78 वर्षीय वयोवृद्ध नागरिकास ही लागण झाल्याचे काल निष्पन्न झाले. ते आपल्या मुलीकडे मुंबईला गेलेले असून, तेथे त्यांच्या तपासणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. या निदानानंतर फक्त कटफळ गावाची हद्द सील करण्यात आली असून, बारामती एमआयडीसीच्या कामकाजावर त्याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

संबंधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या घशातील द्रव्याची तपासणी केली जाणार आहे. संबंधित रुग्णाबाबत प्रशासनाकडून सर्व माहिती गोळा केली जात असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

बारामतीकरांसाठी दिलासादायक बाब अशी आहे की बारामती शहराच्या स्थितीवर या रुग्णाचा कोणताही परिणाम होणार नाही. बारामतीत व्यापाऱ्यांचा संयम आता संपत असून, लवकरात लवकर व्यवहार पूर्ववत करण्यासाठी प्रशासनावर दबाव वाढू लागला आहे. त्यामुळे केवळ कटफळ गावापुरत्याच सीमा सील करण्याच्या निर्णयाचे स्वागत झाले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

योग्य ती खबरदारी घेऊन बाजारपेठ हळुहळू पूर्ववत व्हायला हवी, अशी मागणी सर्व व्यापाऱ्यांकडून होत असल्याने आता प्रशासनालाही लवकरात लवकर काहीतरी निर्णय घ्यावा लागणार अशी स्थिती निर्माण झाली आहे. 

बारामती एमआयडीसीचे कामकाज पूर्ववत सुरु झाल्यानंतर आता बाजारपेठही सुरु करावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे. 
बारामतीत सापडलेला हा नववा रुग्ण आहे. यापूर्वी आठ रुग्ण सापडले होते, त्यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे व उर्वरित सर्व रुग्ण ठणठणीत बरे झालेले आहेत.

रुग्ण नेमका कोणाच्या हद्दीत

सदरच्या रुग्णावर मुंबईत उपचार व निदान झालेले असल्याने तो पुणे विभागात गृहीत धरायचा की मुंबईत याबाबत प्रशासनाच्या वतीने विचारविनिमय सुरु असल्याचेही समजले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Infected Person Found in Katphal