लोणी काळभोरमध्ये भेळ विक्रेत्याला कोरोना; मग आता...

जनार्दन दांडगे
रविवार, 28 जून 2020

- कोविड योद्धासह लोणी काळभोर येथील भेळवाला पॉझिटिव्ह.

- लोणी काळभोर येथील दोनशेहून अधिक जणांची भीतीने बत्ती गुल.

लोणी काळभोर : लॉकडाऊन काळात पोलिस, डॉक्टर, कोरोनासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांना नाष्टा, चहा पाणी पुरवणाऱ्या लोणी काळभोर येथील एका 30 वर्षीय कोरोना योध्यासह, लोणी गावातील एक भेळवाला शनिवारी (ता. २७) कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना योध्याकडून शुक्रवारी दुपारपर्यंत चहापाणी, नाष्ट्याची सेवा घेणारे डॉक्टर, पोलिस, पत्रकार यांच्यासह लोणी गावातील कोरोनाबाधित भेळवाल्याकडून भेळ खरेदी करणारे गावातील दोनशेहून अधिक नागरिकांना आता आपल्यालाही कोरोनाची लागण तर होणार नाही ना या भीतीने बत्ती गुल झाली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु झाल्यापासून लोणी काळभोर येथील 30 वर्षीय तरुण, डॉक्टर, कोरोनासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थाच्या कार्यकर्त्यांना नाष्टा, चहा-पाणी पुरवत आहे. घरची परीस्थिती बेताची असतानाही, मागील शंभर दिवसात या तरुणाने लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील कर्मचारी, लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी, लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीचे कर्मचाऱ्यांंची सेवा केलेली आहे. या तरुणाचे काम  शुक्रवारी दुपारपर्यंत चालू होते. शुक्रवारी दुपारपर्यंत लोणी काळभोर परिसरातील काही पत्रकार, डॉक्टर व शंभरहून अधिक नागरिकांना चहा दिला आहे. मात्र, शुक्रवारी दुपारी सर्दीचे लक्षणे जाणवू लागल्याने, संबधित तरुणाचा स्वॅब तपासल्यानंतर हा तरुण कोरोना पॉझिटीव्ह आला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

लोणी काळभोर गावातील एक प्रसिध्द भेळवालाही शुक्रवारी कोरोनाबाधित आढळून आला. शुक्रवारी दिवसभरात या भेळवाल्याने अनेकांना भेळीचा प्रसाद दिलेला आहे. कोरोना योध्यासह  भेळवाल्याच्या संपर्कात शुक्रवारी दुपारपर्यंत पोलिस, डॉक्टर यांच्यासह दोनशेहून अधिक नागरिक आले आहे. दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आल्याने या दोघांकडून सेवा घेणारे हवालदिल झाले आहेत. सेवा घेणाऱ्यापैकी बहुतांश जणांनी तपासणीसाठी आरोग्य केंद्रात धाव घेतली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

याबाबत अधिक माहिती देतांना लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. डी. जे. जाधव म्हणाले, कोविड योध्द्यासह लोणी काळभोर येथील भेळवाला पॉझिटिव्ह आल्याचे समजताच, स्वॅब (घशातील द्रव) तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी वाढली आहे ही बाब खरी आहे. या कोविड योध्याने मागील शंभर दिवसात अनेकांची मनापासून सेवा केली. भेळवाल्याच्या दुकानातून भेळ नेणारेही तपासणीसाठी गर्दी करु लागले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Infection to the bhel seller in Loni Kalbhor Pune