सावधान! महाराष्ट्रात कोरोनाचा मृत्यूदर वाढतो आहे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

graf.jpg

राज्यातील कोरोना संसर्गाचा प्रमाणाबरोबरच गेल्या एक महिन्यात मृत्यूदर जवळपास एका टक्क्याने वाढला आहे. राज्यात 3 जुलै रोजी कोरोना मृत्यूदर 3.81 टक्के होता. बरोबर एक महिन्यांत मृत्यूदर 4.38 टक्के झाल्याची माहिती पुढे आली. 

सावधान! महाराष्ट्रात कोरोनाचा मृत्यूदर वाढतो आहे

पुणे : राज्यातील कोरोना संसर्गाचा प्रमाणाबरोबरच गेल्या एक महिन्यात मृत्यूदर जवळपास एका टक्क्याने वाढला आहे. राज्यात 3 जुलै रोजी कोरोना मृत्यूदर 3.81 टक्के होता. बरोबर एक महिन्यांत मृत्यूदर 4.38 टक्के झाल्याची माहिती पुढे आली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यात गेल्या महिन्यात 3 तारखेला राज्यात 72 हजार 300 कोरोनाबाधीत रुग्णांची नोंद आरोग्य खात्यात झाली होती. महिन्याभरात या एक लाख 14 हजार 326 रुग्णांची भर यात पडली आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत सुमारे दीड पटीने रुग्णसंख्या वाढली. त्यामुळे 9 मार्चपासून आतापर्यंत एक लाख 86 हजार 626 रुग्णांचे निदान झाले. 

देशात महिन्याभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या तीन पटीने वाढली. आतापर्यंत देशभरातील विविध राज्यांमध्ये मिळून सहा लाख 25 हजार 544 कोरोनाबाधीत रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी एक लाख 86 हजार 626 (30 टक्के) महाराष्ट्रातील रुग्ण आहेत. या एक महिन्यापूर्वी देशाच्या तुलनेत राज्याचा मृत्यूदर 0.61 टक्के जास्त होता. म्हणजे 3 जूनला देशाचा मृत्यूदर 2.80 टक्के होता. तर, महाराष्ट्राचा 3.41 टक्के नोंदला गेला. मात्र, महिन्याभरात हे चित्र बदलले. देशाचा मृत्यूदर 0.11 टक्क्यांनी वाढला. त्याच दरम्यान महाराष्ट्राचा मृत्यूदर 3.41 वरून 4.38 टक्क्यानी म्हणजेच 0.97 ट्क्क्यांनी वाढला, असे राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीच्या विश्लेषणावरून स्पष्ट होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

राज्यात चाचण्याचे प्रमाण वाढले. त्यामुळे पॉझिटीव्ह येणाऱया रुग्णांची संख्याही वाढली. राज्यात 9 मार्चला कोरोना संसर्गाचे निदान करणारी एकमेव राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही) ही एकमेव संस्था होती. पण, 116 दिवसांमध्ये 113 प्रयोगशाळांचे जाळे राज्यात उभे राहिले आहे. त्यात 65 प्रयोगशाळा सरकारी असून, 48 खासगी आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्णांची संख्या वाढली. त्याच निकषानुसार मृतांचाही आकडा वाढला असल्याचे मत राज्याच्या आरोग्य विभागातर्फे नोंदविण्यात येत आहे. पुण्यासारख्या एकट्या शहरांमध्ये दिवसभारत तीन ते चार हजार रुग्णांचे नमूने तपासण्यात येत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा