
म्युकरमायकॉसीसमुळे पुण्यात एकाचा मृत्यू
पुणे : म्युकरमायकॉसीस या बुरशीजन्य आजारामुळे शहरात ४४ वर्ष वयाच्या पुरूषाचा मृत्यू झाला आहे. कोरोनानतर रोगप्रतिकार शक्ती अत्यन्त कमी झालेल्या आणि सहव्याधी (कोमॉर्बेडीटी) असलेल्या निवडक रूग्णांमध्ये हा आजार दिसू शकतो. गेल्या काही दिवसांत अशा रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे.
राज्यातील विविध शहरांमध्ये दोन हजारा पेक्षा अधिक रूग्ण उपचारासाठी दाखल असल्याची माहिती, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांना दिली आहे. संबंधित रुग्ण दाढ दुखते म्हणून रुग्णालयात दाखल झाला होता. पुढे त्याला म्युकरमायकोसिस असल्याचे निदान झाले. त्याच दरम्यान पोटाचा विकार आणि मूत्रपिंडाचा त्रास वाढल्याने उपचाराला मर्यादा येत गेल्या. तसेच हा रूग्ण उशिराने रूग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्याचे समजते. आजाराचे निदान जलद झाले आणि उपचारासाठी वेळेत दाखल केल्यास रूग्ण पुर्णपणे बरा होता. मृत्यू नाका, तोंड आणि डोळ्यांच्या आसपास सूज येणे, प्रचंड दुखणे, चेहरा जड वाटणे, दिसायला कमी होणे आदी या आजाराच्या प्राथमिक लक्षणे आहेत. ही बुरशी प्रचंड वेगाने वाढत असल्याने निदानानंतर तातडीने उपचारासाठी कान, नाक, घसा तज्ज्ञ, डोळ्यांचे डॉक्टर अथवा तोंडाच्या डॉक्टरकडे दाखल होणे गरजेचे आहे.
असा पसरतो म्युकोरमायकोसिस
श्वासोच्छवास आणि त्वचेच्या माध्यमातून रोगजंतू शरीरात प्रवेश करतात. वेगवेगळ्या अवयवांचे ते नुकसान करतात. ‘म्युकोरमायकोसिस’ मेंदू, नाक, सायनस म्हणजेच हवेच्या पोकळ्यांमध्ये वाढते. सुरवातीला हे लक्षात येत नाही. मात्र चेहरा नाक डोळ्याला हळू हळू सूज येताच या ‘फंगल इन्फेक्शन’चे तात्काळ निदान करून उपचार करणे गरजेचे आहे.
हे आहेत उपचार
1. डोळे, गाल आणि अनुनासिक अडथळा किंवा काळ्या कोरड्या कवचाची सूज आल्यावर ‘अँटीफंगल’ औषधी त्वरित सुरू करावी.
2. ‘अँटी फंगल’ औषोधपचार आणि शस्त्रक्रियेद्वारे वेळीच उपचार झाल्यास कान, नाक, डोळे वाचवण्यात डॉक्टरांना यश येऊ शकते.
3. काही रुग्णांत पुढच्या टप्प्यातील या ‘इन्फेक्शन’ मुळे हाडांची झीज झाल्याने व ‘इन्फेक्शन’ नजीकच्या भागात, मेंदू पर्यंत पसरू नये यासाठी शस्त्रक्रिया करून झीज झालेले हाड काढावे लागते त्यात लगतचा अवयव गमवावा लागतो.
4. कोविडपासून मुक्त झाल्यानंतर नियमित व्यायाम, मधुमेहावर नियंत्रण मिळविण्यासाठी योग्य औषोधपचार, सोबत सकस आहार घ्या.
Web Title: Corona One Dies Of Mucormycosis In
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..