बारामतीजवळील तांदुळवाडीमध्ये सापडला कोरोना रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 May 2020

- बारामती परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले.

बारामती : शहरातील तांदुळवाडी भागात आणखी एक कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्याने पुन्हा एकदा बारामती परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची व्यक्ती ही कंपनी कर्मचारी असून, आईच्या अंत्यविधीसाठी पुण्याला गेलेली होती. पुण्याहून 21 मे रोजी बारामतीत सदर व्यक्ती आल्यानंतर लगेच रुई रुग्णालयांमध्ये तिची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये सदर व्यक्तीला कोरोना लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बारामती शहर व तालुक्यातील मिळून हा तेरावा रुग्ण असून, यापैकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला. तर सात जण बरे झाले आहेत. चार जणांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, यानंतर प्रशासनाने अधिक खबरदारी घेण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. पुणे व मुंबईहून येणारी माणसे ही बारामतीकरांसाठी डोकेदुखी ठरत असल्याची बाब पुन्हा एकदा सिद्ध झालेली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

परगाव किंवा परराज्यातून येणाऱ्या प्रत्येकाची माहिती प्रशासनाला देणे बंधनकारक असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. आपल्या शेजारी येणाऱ्या परराज्यातील किंवा परगावातील व्यक्तींची माहिती लोकांनी देखील प्रशासनाला कळवावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Patient Found in Tandulwadi Baramati