मुळशी तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या पन्नाशीच्या उंबरठ्यावर

धोंडिबा कुंभार
सोमवार, 29 जून 2020

मुळशी तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने आज पन्नाशीच्या  उंबरठ्यावर पाऊल ठेवले.  आज तालुक्यात दोन कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. 

पिरंगुट (पुणे) : मुळशी तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने आज पन्नाशीच्या  उंबरठ्यावर पाऊल ठेवले.  आज तालुक्यात दोन कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. 

मुळशी तालुक्यात कोरोनग्रस्तांची संख्या कमी होण्याची चिन्हे नाहीत.  आज तालुक्यात दोन कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णांची संख्या ४८ झाली आहे.  कासार आंबोली (ता. मुळशी) येथील एका पुरुषास व नांदे येथील एका पुरुषास कोरोनची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.  

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आज अखेर मुळशी तालुक्यात कोरोनाग्रस्तांची संख्या अठ्ठेचाळीस झाली असली, तरी आणखी रुग्ण असण्याची शक्यता नाकारता येत नाही.  कारण, रुग्णाची माहिती तालुका स्तरावर समजेपर्यंत दोन दिवस उलटलेलेले असतात.  कासार आंबोलीतील रुग्णांची संख्या आता तीन झाली आहे. यापूर्वी २३ जूनला सुतारवाडीत दोन रुग्ण सापडले आहेत.  तालुक्यात कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण वाढतच चालले असल्याने नागरिकांनी स्वतःहून प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे अतिशय गरजेचे झालेले आहे. नांदे येथील रुग्ण  गावातच राहतात. गावातील अनेक कुटुंबे पिण्याचे पाणी आणायला रोज चांदे येथे जातात. त्यामुळे चंदे येथील पाणी पुरवठा तात्पुरता बंद करावा लागणार आहे.    


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona patients increased in Mulshi taluka

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: